नवी दिल्ली – सरकारने ऑनलाईन गेमिंगसाठी नवीन नियम जारी केले आहेत. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी नवीन नियमांची घोषणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सट्टेबाजी, ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या जाहिरातीविरुद्ध नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन गेमिंगसंदर्भातील जाहिराती प्रसारित न करण्याचा सल्लाही माध्यमांना देण्यात आला आहे. राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, ‘जुगार किंवा सट्टेबाजीचा समावेश असलेले ऑनलाईन गेम नवीन ऑनलाईन गेमिंग नियमांच्या कक्षेत येतील. आम्ही एका फ्रेमवर्कसह काम करत आहोत. ज्याद्वारे सर्व ऑनलाईन गेमिंगचे नियमन स्वयं-नियामक संस्थाद्वारे केले जाईल. म्हणजेच, गेममध्ये गॅम्बलिंग आहे की नाही हे एसआरओ ठरवतील. या एसआरओमध्ये उद्योगासह सर्व भागधारकांचा सहभाग असेल. एक एसआरओ प्रत्येक गेमचे निरीक्षण आणि न्याय करण्यासाठी काम करेल. अॅपमध्ये बेटिंगचा समावेश आहे की नाही, या आधारे परवानगी निश्चित
केली जाईल.