चंद्रपूर – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भारतातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्याला व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन प्रक्रियेत देशात १४ वा क्रमांक मिळाला आहे. हे राष्ट्रीय उद्यान सध्या व्हेरी गुड कॅटेगरीत आले आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने देशातील राष्ट्रीय उद्याने व वन्यजीव अभयारण्यांसाठी २०२२ च्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापन प्रक्रियेच्या पाचव्या टप्प्याचा निकाल जाहीर केला आहे. त्या अंतर्गत पेरियार व्याघ्र प्रकल्पाला प्रथम स्थान घोषित केले. दुसरे स्थान अनुक्रमे सातपुडा, बांदीपूर व तिसरा क्रमांक नागरहोलला मिळाला. केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व भारतीय वन्यजीव संस्था यांच्या मदतीने होणारे हे मूल्यांकन ४ रँकिंगमध्ये विभागले आहे. हे रँकिंग राष्ट्रीय उद्यान किंवा वन्यजीव अभयारण्य कसे व्यवस्थापित केले जाते यावर आधारित असते.यावर त्यांची कॅटेगिरी विभागण्यात आली. त्यानुसार, ४०टक्के गुण असलेला वन्य जीव प्रकल्प व राष्ट्रीय उद्यान निकृष्ट दर्जा, न४१ ते ५९ टक्के गुण असलेला प्रकल्प स्वच्छ, ६० ते ७४ टक्क्यांपर्यंत गुण असलेला प्रकल्प उत्कृष्ट,तर ७५ हून अधिक गुण असलेले रँकिंग सर्वोत्तम मानले जाते.