मुंबई- भारतातील गायीच्या शेणाला परदेशात मोठी मागणी आहे. एका अहवालानुसार,२०२३-२४ या वर्षभरामध्ये भारतातून जवळपास १२५ कोटी रुपये किमतीचे शेण निर्यात करण्यात आले आहे.
भारतातून सुमारे १७३ कोटी रुपये किमतीचे गायीच्या शेणापासून बनवलेले खत निर्यात करण्यात आले आहे. याशिवाय ८८ कोटीचे कंपोस्ट खतही निर्यात केले आहे. सगळ्यांची बेरीज केल्यास तब्बल ३८६ कोटी रुपये किमतीचे शेण परदेशात निर्यात करण्यात आले आहे, असे या अहवालात म्हटले आहे. भारताकडून शेण खरेदी करण्यामध्ये मालदीव पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अमेरिका, सिंगापूर, चीन,नेपाळ, ब्राझील, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कुवेत, यूएईने शेण आयात केले आहे. भारतातील शेण हे विदेशातील शेतकऱ्यांसाठी सोन्याची खाण ठरत आहे. त्यामुळे या शेणाला मोठी मागणी आहे.