नवी दिल्ली – भारताचे पहिले अंतराळ पर्यटक अशी ओळख असलेल्या गोपीचंद थोटाकुरा आपली अंतराळ मोहिम पूर्ण करुन परत आले आहेत. त्यांचे आज नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले.गोपीचंद थोटाकुटा हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनचे अंतराळयान शेफर्ड २५ मधून अंतराळ जाण्यासाठीच्या कर्मचारी दलात होते. त्यातूनच त्यांनी अंतराळात प्रवास केला. आपली मोहिम आटोपल्यानंतर त्यांचे आज नवी दिल्लीत आगमन झाले. यावेळी ते म्हणाले की, अंतराळात जाण्याची अनुभूती विलक्षण होती. मी बऱ्याच दिवसांनी मयदेशात येत आहे. त्याची मी वाट पाहात होतो. आज आपल्या देशात आल्याचा आनंद झाला. भारतासाठी हा गौरवाचा क्षण असून देशाचे प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान वाटतो.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |