नवी दिल्ली- भारताच्या चालू आर्थिक वर्षाच्या २०२४-२५ च्या जीडीपी वाढीच्या अंदाजात एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सने कपात केली आहे.जुलै-सप्टेंबरमध्ये जीडीपी वृद्धी दर म्हणजेच एकूण देशांतर्गत उत्पादन दर घसरला होता.त्यानंतर आता नवा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
यंदाच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीनंतर भारताची जीडीपी वाढ तिमाहीपूर्वी जाहीर केलेल्या ६.७ टक्क्यांवरून ५.४ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे.त्यामुळे संपूर्ण वर्षाच्या अंदाजात ६.८ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत घट कपात केली आहे,असे एस अॅण्ड पी ग्लोबलने म्हटले आहे. उत्पादन आणि खाण क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे या आर्थिक वर्षांच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताचा जीडीपी ५.४ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे सांगण्यात आले होते.