खेड – पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदी पाठोपाठ आता खेड तालुक्यातील भामा नदीही केमिकलयुक्त पाण्यामुळे फेसाळली असून आता भामा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
भामचंद्र डोंगरापासून सुरू झालेली भामा नदी पुढे जाऊन शेलगाव येथे भीमा नदीला मिळते. या नदीच्या काठावर चाकण औद्योगिक वसाहतीच्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे रसायनयुक्त आणि सांडपाणी इंद्रायणी आणि भामा नदीत सोडले जाते. त्यामुळे या नद्यांना हिमनद्यांचे स्वरूप प्राप्त होत आहे.
या रसायनयुक्त पाण्यामुळे वाकी, काळुस, भोसे, शेलगाव व रिसरातील शेतकर्यांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या रसायन युक्त पाण्यामुळे भामा नदीतील जलचर प्राणी नष्ट होत आहे. या नदी प्रदुषणाचे पाप चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्याचे मालक करत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. हे पाप करणार्या कंपन्यांना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याचेही या शेतकर्यांनी म्हटले आहे.