भाजप नेते मोहित कंबोज यांचे तेजस ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई- छत्रपती संभाजी बिग्रेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन कांबळे यांनी सोमवारी ट्विट करत भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मंगळवारी भाजप नेते कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केले आहे. सचिन कांबळे यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. या पत्रकार परिषदेत कंबोज यांनी तेजस ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोरोना काळात जेव्हा हाॅटेल १० नंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तेजस ठाकरे १० नंतर हाॅटेल मध्ये जाऊन दारु घेत होते. याचे जीएसटी सहित बिल कंबोज यांनी पत्रकार परिषदेत दाखवले होते. तेजस ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर ठाकरे गटाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मोहित कंबोज म्हणाले की, माझ्याविरुद्धचे षडयंत्र रचले जात आहे. डुकरांशी कधीही कुस्ती करू नका, असा टोलाही त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे. संजय राऊत वेडे झाले आहेत ते जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. संजय राऊत कुठे जातात, कुठे राहतात, काय खातात, हे बाहेर काढायला लावू नका. महागात पडेल. ग्रँड हयातमध्ये जाऊन काय करता याच व्हिडिओ माझ्याकडे आहेत. मला खालच्या स्तरावर जाऊन बोलायला लावू नका, असाही इशारा कंबोज यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top