Home / News / भाजपा हा भ्रमिष्ट पक्ष! संजय राऊत यांचा टोला

भाजपा हा भ्रमिष्ट पक्ष! संजय राऊत यांचा टोला

मुंबई – भारतीय जनता पार्टी हा भ्रमिष्ट झालेला पक्ष आहे. आपण काय कर्म केले आहे याचा या पक्षाला विसर पडला...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – भारतीय जनता पार्टी हा भ्रमिष्ट झालेला पक्ष आहे. आपण काय कर्म केले आहे याचा या पक्षाला विसर पडला आहे,असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत लगावला.

बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेला संप न्यायालयाच्या आदेशामुळे मागे घ्यावा लागला.पण आम्ही मूक आंदोलनाने निषेध नोंदविला. त्या आंदोलनाच्या विरोधात भाजपाने आंदोलन केले. त्यांना याचा विसर पडला की त्यांच्या सरकारमध्ये दोन मंत्री असे आहेत की ज्यांच्यावर महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा राजीनामा घेतला होता. भाजपाच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले. अशा लोकांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. बदलापूरच्या घटनेचा निषेध करताना आपल्याच मंत्रिमंडळात असलेल्या अत्याचाऱ्यांचा राजीनामा घ्या,असे राऊत म्हणाले.

Web Title:
संबंधित बातम्या