बंगळुरु – माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार मुनिरत्न याने एडसची लागण झालेल्या सहा महिला रुग्णांच्या साह्याने कर्नाटकच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून स्वतः मंत्रिपद मिळवले होते, असा खळबळजनक आरोप मुनिरत्न यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या पीडितेने केला.
या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुनिरत्न याला अटक केली असून तो सध्या कारागृहात आहे.बंगळुरु येथे एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पीडितेने मुनिरत्न याच्यावर हा आरोप केला.मुनिरत्न याने मंत्रिपद मिळविण्यासाठी दोन माजी मुख्यमंत्र्यांना एडस् झालेल्या महिलांचा वापर करून हनीट्रॅपमध्ये अडकवले. मुनिरत्न याच्याकडे अतिशय प्रगत कॅमेरे आहेत, जे इतर कोणाकडेही नसतील. मुनिरत्न याने बड्या पोलीस अधिकाऱ्यांनाही आमच्यासारख्या असहाय्य महिलांचा वापर करून ब्लॅकमेल केले. त्यांचे अश्लिल व्हिडिओ तयार केले आहेत, असा दावा पीडितेने केला. मुनिरत्न याची ब्रेन मॅपिंग चाचणी घ्यावी,अशी मागणी तिने केली.