भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार! प्रसाद लाड यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई- भाजपा मनसे उमेदवार अमित ठाकरे यांचाच प्रचार करणार अशी भूमिका भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्ट केली. शिंदे गटाकडून माहीम मतदारसंघात सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढत असलेल्या अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. तर सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. यावरून प्रसाद लाड म्हणाले की, अमित ठाकरे राज ठाकरेंचा मुलगा असला तरी आम्ही त्याला आमच्या मुलासारखाच समजतो. या निवडणुकीत आम्ही राज ठाकरे यांना मदत करण्यावर ठाम आहोत. सदा सरवणकर हे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत.

ते पुढे म्हणाले की, सदा सरवणकर हे अनेकदा जनतेतून निवडून विधानसभेवर गेले आहेत. यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांची समजूत काढता येईल. एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी द्यायला हवी. त्यांच्याकडे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद पाच वर्षांसाठी दिले आहे. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मला वाटते की, सरवणकर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमची भूमिका मान्य करतील. आम्ही या निवडणुकीत अमित ठाकरे यांचा प्रचार करणार आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top