मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ३७ मतदारसंघातील बंडखोरी करणाऱ्या ४० जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी अनेक बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती. राज्यातील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र, काही बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही. महायुतीचा मोठा घटक पक्ष असलेल्या भाजपाच्या ४० जणांनी अर्ज मागे घेतले नाही. त्यामुळे अमरावतीतील आमदार रवी राणांनी बंडखोरी करणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांनी तुषार भारतीय आणि श्रीकांत भारतीय यांच्यावर विशेषत: कारवाई करण्याचे आवाहन केले होते. यापैकी तुषार भारतीय यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. दरम्यान, भाजपाच्या कारवाईनंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांच्या पक्षातील बंडखोरावर कारवाई करणार का हा प्रश्न निर्माण होत आहे.
या कारवाईत १. धर्मेंद्र ठाकरू(जोगेश्वरी), २. दिलीप भोईल(अलिबाग),३. बाळासाहेब मरकुटे(नेवासा),४ . शोभा बनशेट्टी(सोलापूर),५. सुनिल बंडकर(अक्कलकोट), ६. सुवर्णा पाचपुते(श्रीगोंदा), ७. विशाल परब(सावंतवाडी), ८. श्रीकांत करर्ले, ९. सोपान पाटील(धुळे), १०. मयूर कापसे, ११. आश्विन सोनवणे(जळगाव)१२. गजानन महाले(अकोट), १३. नागेश घोपे(वाशिम), १४. तुषार भारतीय(बडनेरा),१५. जगतीश गुप्ता(अमरावती),१६. प्रमोद गडरेल(अचलपूर),१७. सुरेश सोनवणे(गंगापूर),१८.एकनाथ जाधव (वैजापूर),१९. कुणाल सूर्यवंशी(मालेगाव),२०. आकाश साळुंखे(बागलान),२१. जयश्री गरुड(बागलान),२२. हरिष भगत(नालासोपारा), २३. स्नेहा पाटील(भिवंडी), २४. वरुण पाटील(कल्याण),२५. गोपाळ जव्हेरी(मागाठणे),२६ . सोमदत्त करंजेकर(साकोली),२७ . शंकर मडावी(आमगाव),२८ . ब्रिजभूषण पाझारे(चंद्रपूर), २९ . वसंत वरजुकर,३० . राजू गायकवाड,३१. आतेशाम अली, (ब्रह्मपूरी),३२. भाविक भगत, ३३. नटवरलाल अंतवल (उमरखेड)३४ . वैशाली देशमुश,३५. मिलिंद देशमुख,३६ . दिलीप कंदकुर्ते, ३७ . सुनील मोरे, ३८ . संजय घोगरे (नांदेड),३९ . सतीश घाटगे(घणसांवगी), ४०. अशोक पांगारकर(जालना) या सदस्यांची बंडखोरी केल्याने पक्षातून हकालपट्टी केली आहे.