सिंधुदुर्ग – मालवण तालुक्याच्या आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या दोन दिवसीय यात्रेला आजपासून सुरुवात झाली. भराडीदेवीचा जय्यघोष करत हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. त्यासोबत माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्यासह स्थानिक राजकीय नेत्यांनी भराडीदेवीचे दर्शन घेतले.या यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक आंगणेवाडीत दाखल झाले आहेत. देवीला सुवर्ण अलंकार आणि भरजरी साडी नेसवण्यात आली. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि मंदिर व्यवस्थापनाने चोख बंदोबस्त ठेवला असून या यात्रेनिमित्त मंदिर परिसरात ४० सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे. त्यासोबत मंदिराचा गाभारा आर्कषक फुलांनी सजवण्यात आला आहे. ही यात्रा रविवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
भराडीदेवीच्या यात्रेला सुरुवात दर्शनासाठी भाविकांची रिघ
