भटिंडा लष्करी छावणीमध्ये गोळीबार चार जवानांचा मृत्यू! अंतर्गत वादाचा संशय

टिंडा – पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनवर बुधवारी सकाळी झालेल्या गोळीबारात लष्कराचे चार जवान शहीद झाले. हे जवान 80 मीडियम रेजिमेंटचे होते. पहाटे 4.35 वाजता मिलिटरी स्टेशनच्या मेसमध्ये गोळीबार झाल्याचे लष्कराने सांगितले.
गोळीबारप्रकरणी एका संशयिताला भटिंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोळीबार करणारा साध्या कपड्यांत होता असे लष्कराकडून सांगण्यात आले. याप्रकरणी पंजाब पोलीस आणि लष्कराचे पथक संयुक्तपणे तपास करत आहेत. पंजाब पोलिसांनी ही घटना दहशतवादी हल्ला नसल्याचे सांगितले. जवानांमधील अंतर्गत वादातून गोळीबार झाला असावा अशी प्रतिक्रिया भटिंडाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक जी. एस. खुराना यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी युनिटच्या गार्ड रूममधून आयएनएसएएस रायफल आणि 28 गोळ्या गायब झाल्या होत्या. गोळीबाराच्या घटनेत याच रायफलचा वापर केल्याची शक्यता पोलीस आणि लष्कराने वर्तवली. गोळीबारानंतर लष्कर छावणी सील करण्यात आली असून परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. याशिवाय घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top