मुंबई- मुंबई शहरातील पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना यापुढे पालिकेने निश्चित केलेल्या जागेतच खाद्यपदार्थ देणे बंधनकारक असणार आहे. या कुत्र्यांना कुठे आणि कोणत्या वेळेत खाद्यपदार्थ द्यावे याबाबत नियमावली तयार केला आहे. हा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
भटक्या कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार असून त्यांना त्रास देणे योग्य नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देण्यासाठी जागा निश्चित करा, अशा सूचना न्यायालयाने केली आहे . या निर्देशानुसार आता भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ कुठे टाकावेत यासाठी नियमावली तयार करण्यात येत आहे. सध्या मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या तीन लाख पर्यंत आहे.या कुत्र्यांचे वेळोवेळी निर्बीजीकरण केले जाते.