Home / News / भंडाऱ्यात ट्रॅक दरीत कोसळून एकाचा मृत्यू

भंडाऱ्यात ट्रॅक दरीत कोसळून एकाचा मृत्यू

भंडारा- तुमसर-बपेरा मार्गावर असलेल्या खैरलांजी पुलावरून पावर प्लांटची निष्क्रिय बुकटी घेऊन जाणारा ट्रॅक दरीत खाली कोसळला. ही घटना आज सकाळी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

भंडारा- तुमसर-बपेरा मार्गावर असलेल्या खैरलांजी पुलावरून पावर प्लांटची निष्क्रिय बुकटी घेऊन जाणारा ट्रॅक दरीत खाली कोसळला. ही घटना आज सकाळी ७ वाजता घडली. या अपघातात वाहकाचा जागीच मृत्यू झाला, तर चालक हा गंभीर जखमी झाला.
जितू सयसपूर असे मृत वाहकाचे नाव असून आकाश बारबैले असे जखमी चालकाचे नाव आहे. चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॅक खैरलांजी पुलावरून खाली कोसळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य करत असताना वाहक मृत अवस्थेत आढळला. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या चालकाला तुमसरच्या शासकीय रुग्णालयात हलविले.

Web Title:
संबंधित बातम्या