भंडारा – जवाहरनगर शस्त्रास्त्रनिर्मिती कारखाना स्फोट प्रकरणी दोन महाप्रबंधकांची तातडीने बदली करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे प्रशासनाने कारवाई करत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुख्य महाप्रबंधक सुनील सप्रे, महाप्रबंधक ललित कुमार आणि अनुज किशोर प्रसाद यांचा समावेश आहे. सुनील सप्रे यांच्या जागी दीपक देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. तर, महाप्रबंधक ललित कुमार आणि दुसरे महाप्रबंधक अनुज किशोर प्रसाद यांची बदली अन्यत्र झाली, मात्र ते भंडारा येथे राहून नवनियुक्त मुख्य महाप्रबंधक दीपक देशमुख यांना सहाय्य करणार आहेत. या बदल्यांचे आदेश देशातील शस्त्रास्त्रनिर्मिती संचालन करणाऱ्या म्युनिशस इंडिया लिमिटेडचे उपमहाप्रबंधक शाहीर फारुकी यांनी दिले आहेत.
दरम्यान, २४ जानेवारीला या कारखान्यातील एलटीपीइ विभागात सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला होता. यामध्ये आठ जणांचा मृत्यू आणि पाच जण गंभीर जखमी झाले होते. याशिवाय एलटीपी सेक्शनची संपूर्ण इमारत कोसळून नुकसान झाले होते.
भंडारा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना स्फोटप्रकरणी तीन अधिकाऱ्यांची बदली
