भंडारा – जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कोका वन्यजीव अभयारण्यामध्ये वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.तर याच जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ईटान येथे लांडग्यांच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे.
नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कोका वन्यजीव अभयारण्यातील खुर्शिपार तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील नाल्यात टी-१३ या पट्टेदार वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तीन दिवसापासून हा मृतदेह पाण्यात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना टी-१३ या वाघाचा मृतदेह आढळून आला.त्यानंतर नवेगांव-नागझिराच्या व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकासह वन विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.या वाघाचे विच्छेदन केले असून मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही.
दुसरीकडे याच भंडारा जिल्हाच्या लाखांदूर तालुक्यातील ईटान येथे लांडग्यांच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक शेळी गंभीर जखमी झाली. धीरज बाळकृष्ण घरडे ईटान येथील धीरज बाळकृष्ण घरडे असे त्या नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे. घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकून धीरज घरडे यांना जाग आली.तेव्हा त्यांना हा प्रकार समजला.लाखांदूर वन विभागाने या घटनेचा पंचनामा केला असून यात या पशुपालकाचे एकूण ६० हजाराचे नुकसान झाले आहे.तरी या पशुपालकासह गावकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
भंडारा जिल्ह्यात वाघाचा मृत्यू