ब्रिटनमध्ये महागाई दर
वाढल्याने परिस्थिती गंभीर

भारतीय विद्यार्थ्यांना फटका

इंग्लंड : ब्रिटनमध्ये मंदीचा काळ सुरू आहे. लोकांचे उत्पन्न महागाई दराच्या तुलनेत खूप कमी आहे. ब्रिटनने भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना पंतप्रधानपदी बसवले. मात्र अनेक महिने लोटले तरी सुनक यांच्याकडून विशेष काही बदल केल्याचे दिसत नाही. याउलट ब्रिटनमध्ये अर्थव्यव्यस्थेवर परिणाम होऊन महागाई वाढली आहे. यावर नियंत्रण मिळविण्याचे सगळे प्रयत्न सुनक यांच्याकडून अयशस्वी होत असल्याचे दिसत आहे.
ब्रिटनमध्ये गेल्या चार महिन्यांत हा महागाईचा दर वाढला आहे. या वाढत्या महागाईचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना अधिक जाणवत आहे. ब्रिटन मध्ये शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आता येथे रूम देखील मिळत नाही. ब्रिटनमध्ये महागाई दर वाढल्याने प्रयेक गोष्टीसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. ब्रिटन मधील अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी हा महागाई दर वाढविण्यात आल्याचे समजते. नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसने बुधवारी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक मागील महिन्यातील १०.१ टक्क्यांवरुन १०.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. चलनवाढ बँक ऑफ इंग्लंडच्या २ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा पाचपट जास्त आहे. बँकांकडून डिसेंबर २०२१ पासून सलग दहा वेळा दर वाढवले ​​आहेत, जे आता चार टक्क्यांवर पोहोचले आहेत. त्यामुळे बँक ऑफ इंग्लंडवर व्याजदर वाढवण्याचा दबावही वाढला आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात ब्रिटनमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. युक्रेन युद्धाचा परिणाम ब्रिटनची अर्थव्यवस्था पुरती कोलमडली. ब्रिटनमधील मालाची आवक झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सुपर स्टोअरमध्ये फळे आणि भाज्यादेखील येथील नागरिकांना उपलब्ध होत नाही आहेत आणि जिथे मिळतात तिथे जादा पैसे मोजावे लागत आहेत.

Scroll to Top