Home / News / ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी लॅरी बोका सज्ज

ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी लॅरी बोका सज्ज

लंडन – ब्रिटनमधील निवडणुकीनंतनर किर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लॅरी बोका सज्ज आहे. लॅरी पंतप्रधानांचे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

लंडन – ब्रिटनमधील निवडणुकीनंतनर किर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लॅरी बोका सज्ज आहे. लॅरी पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या 10 डाऊनिंग स्ट्रिटवरील कायमस्वरूपी कर्मचारी असून लॅरी द कॅट अशी त्याची ओळख आहे. महत्त्वाचे म्हणजे लॅरीकडे पंतप्रधानांच्या निवासस्थानी राहण्यासाठी अधिकृत पद आहे. मुख्य उंदीर नियंत्रक अशी जबाबदारी त्याच्याकडे आहे.

लॅरीचे 15 फेब्रुवारी 2011 रोजी पंतप्रधान कार्यालयात आगमन झाले. तेव्हापासून मागील 14 वर्षांच्या मुक्कामात त्याने आतापर्यंत पाच पंतप्रधान पाहिले आहेत. तो आता त्याच्या कारकिर्दीतील सहाव्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे लॅरी हा प्रथमच लेबर पार्टीच्या पंतप्रधानांसोबत कार्यरत असेल.
विशेष बाब अशी की, लॅरीचे मालक हे पंतप्रधान नसतात. त्याची जबाबादारी निवासस्थानातील कर्मचार्‍यांकडे असते. त्यामुळे पंतप्रधान बदलले तरी लॅरी येथेच राहतो. लॅरी हा भांडखोरही आहे. त्याने आजूबाजूच्या सर्व मांजरांना पिटाळून लावले आहे. ब्रिटनचे मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कुत्र्यासोबतही त्यांची भांडणे झाली होती, असे सुनक यांच्या पत्नी अक्षता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

Web Title:
संबंधित बातम्या