नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाला जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने काल याबाबत माहिती दिली. रशिया या वर्षी १६व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे. रशियातील कझान येथे होणाऱ्या या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सदस्य देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही करतील. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हेही या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान पीएम मोदी आणि जिनपिंग यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे.
ब्रिक्सनिमित्त पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा
