ब्राझिलिया- ब्राझीलच्या उत्तर ॲमेझॉन राज्यात शनिवारी झालेल्या विमान अपघातात पायलटसह १४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ब्राझील आणि अमेरिकेतील नागरिकांचा समावेश आहे. सर्व प्रवासी बार्सिलोनामध्ये मासेमारीसाठी जात होते.
हा अपघात भारतीय वेळेनुसार रात्री ११.३० वाजता अमेझोनासची राजधानी मानौसपासून ४००किमी अंतरावर असलेल्या बार्सेलोस प्रांतात घडला. या विमान अपघातात १२ प्रवासी आणि दोन क्रू मेंबरच्या मृत्यूमुळे दु:ख झाल्याची प्रतिक्रिया ॲमेझॉन राज्याचे राज्यपाल विल्सन लिमा यांनी ट्विटरवर दिली असून, मृतांच्या नातेवाइकांना आवश्यक ती मदत देण्यासाठी आम्ही तयार असून, त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस पडत होता. खराब हवामानामुळे वैमानिकाला विमान उतरवण्यासाठी लँडिंग स्ट्रिपचा अंदाज आला नसल्याने हा अपघात झाला. नॅशनल सिव्हिल एव्हिएशन एजन्सीने सांगितले की, १८ प्रवाशांची क्षमता असलेले इएमबी-११०नावाचे हे विमान मानोस टैक्सी ऐरियो नावाच्या कंपनीचे होते. हे विमान मनौसहून बार्सिलोनाला जात होते. ९० मिनिटांची फ्लाइट होती. कंपनीनेही या अपघाताला दुजोरा दिला आहे. घटनास्थळावरून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. शहरात कोल्ड स्टोरेजची सुविधा नसल्याने सर्व मृतदेह जवळच्या स्थानिक शाळेत नेण्यात आले.
ब्राझीलच्या उत्तर ॲमेझॉनमध्ये विमान अपघात!१४ मृत्युमुखी
