Home / News / ब्रह्मपुरीत विजेचा धक्काचार शेतकऱ्यांचा मृत्यू

ब्रह्मपुरीत विजेचा धक्काचार शेतकऱ्यांचा मृत्यू

चंद्रपूर – मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुरीच्या गणेशपुर गावात विद्युत तार शेतात तुटून पडली. त्यावेळी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या चार शेतकऱ्यांना आज...

By: E-Paper Navakal

चंद्रपूर – मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुरीच्या गणेशपुर गावात विद्युत तार शेतात तुटून पडली. त्यावेळी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या चार शेतकऱ्यांना आज सकाळी विजेचा जोरदार झटका बसला. त्यात चारही जणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दोन- तीन दिवसांपासून पाऊस सुरु होता. आज सकाळी पावसाने उघडीप असल्यामुळे अनेक शेतकरी शेतात कामासाठी गेले होते. यावेळी शेतात काम करत असताना पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे आणि नानाजी राऊत या ४ शेतकऱ्यांना तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, या घटनेची माहिती गावात समजताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी धाव घेतली.

Web Title:
संबंधित बातम्या