बोर्डीत ८ व ९ फेब्रुवारीला चिकू महोत्सव होणार

पालघर – रूरल आंत्रप्रूनर्स वेल्फेअर फाउंडेशनच्या (आरईडब्लूएफ)वतीने डहाणूच्या बोर्डी येथे ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षीच्या महोत्सवात आयोजकांनी काही नवीन उपक्रमांचा समावेश केला असून पर्यटकांचा त्याला भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी खात्री आयोजकांना आहे.शेती, ग्रामीण उ‌द्योजकता व समृद्ध ग्रामीण संस्कृती यांचा पर्यटनाबरोबर मेळ घालून ग्रामीण अर्थव्यवस्था सबल करणे व त्यासोबतच् ग्रामीण जीवनाला सन्मान प्राप्त करून देणे या उद्देशाने २०१३ मध्ये चिकू महोत्सवाचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते.पालघर जिल्ह्यातील वाढत्या पर्यटनाला दिशा देऊन अनुभव देणारे पर्यटनस्थळ म्हणून ओळख निर्माण करणे या मूळ उ‌द्देशाला बाधा न येता सातत्याने दर वर्षी कार्यक्रमात काही ना काही नाविन्य देण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे अवघ्या दोन दिवसात लाखभर पर्यटक या कार्यक्रमाला भेट देतात.यावर्षी त्यात सातत्य कायम राहील आणि मोठ्या प्रमाणात चोखंदळ पर्यटक चिकू महोत्सवाला भेट देतील असा विश्वास आयोजकांना आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top