न्यूयार्क – आर्थिक संकटामुळे विमान उत्पादक कंपनी बोईंग आपल्या १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. त्यामुळे या कंपनीतील १७,००० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहेत.बोईंगचे अध्यक्ष आणि सीईओ ऑर्टबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे हे कळवले आहे. या कंपनीत सध्या जगभरात १,७०,००० कर्मचारी काम करतात. त्यात २ महिन्यांपूर्वी ३३ हजार कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कंपनीतील विमान उत्पादन एक महिन्यापेक्षा अधिक दिवस बंद होते. त्यामुळे कंपनीला तिसऱ्या तिमाहीत मोठे नुकसान झाले. परिणामी या कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला. ऑर्टबर्ग म्हणाले की, आम्ही २०२७ पर्यंत ७६७ मालवाहू विमानांचे उत्पादनदेखील थांबवणार आहोत. सध्या या विमानांची मिळालेली ऑर्डर या कंपनीत पूर्ण करणार आहोत.
बोईंग कंपनी १० टक्के कर्मचाऱ्यांना काढणार
