सिहोर – मध्य प्रदेशातील सिहोर येथे ३०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सृष्टी या अडीच वर्षाच्या मुलीला तिसऱ्या दिवशी बाहेर काढण्यात यश आले. मात्र तिचा जीव वाचवता आला नाही. तीन दिवसानंतर सृष्टीचा अखेर मृत्यू झाला.
रोबोट टीमने या मुलीला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीला वाचवण्यासाठी रोबोटिक तज्ज्ञांची टीम काल गुरुवारी सकाळी बचावकार्यात सहभागी झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून तिला पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. मुलगी आणखी खाली घसरल्याने तिला वाचवणे अवघड झाले होते. सुमारे १०० फूट खोल दरीत मुलगी अडकली होती. मृतदेह वाचवण्यासाठी लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांना मदत करण्यात आली होती. या मुलीला वाचविण्यासाठी रेस्क्यू टीम कॅमेऱ्यावर ठेवून होती.तिला बाहेरही काढले. तिच्यावर उपचार सुरू झाले. पण ती फार काळ बाहेर जिवंत राहू शकली नाही.
बोअरवेलमध्ये पडलेल्या सृष्टीचा दुर्दैवी मृत्यू!
