मुंबई – देशातील पहिल्यावहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकूल (बीकेसी) ते शिळफाटा या २१ किलोमीटरच्या बोगद्यातील समुद्राखालून जाणाऱ्या ७ किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याचे काम सुरू झाले असून या बुलेट ट्रेन प्रकल्पातील एकूण ९ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरएल) ही माहिती दिली. बुलेट ट्रेन प्रकल्पात नद्यांवरून जाणारे एकूण २४ पूल नियोजित आहेत. त्यापैकी ९ पुलांचे बांधकाम आतापर्यंत पूर्ण झाले आहे असे एनएचएसआरएलने सांगितले.