बुद्धाचा मार्ग हाच भविष्याचा मार्ग! मोदींचे बुद्धिस्ट शिखर परिषदेत वक्तव्य

नवी दिल्ली- संस्कृती मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेे. त्यावेळी मोदी म्हणाले की, ‘तथागत बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर जग चालले असते तर हवामान बदलासारख्या संकटाचा कधी सामना करावा लागला नसता. बुद्धाचा मार्ग हाच भविष्याचा मार्ग आहे. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘गेल्या शतकात काही देशांनी येणाऱ्या पिढ्यांबद्दल विचार न केल्याने हवामान बदलासारखे संकट आले आहे.

लाईफस्टाईलचा प्रभाव देखील वसुंधरेवर पडत आहे,पंरतु आपण ठरवले तर पृथ्वीला या संकटातून वाचवू शकतो. प्रत्येक व्यक्ती हवामान बदलाच्या समस्येचा सामना करू शकतो. नागरिकांना जागरुक होवून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रयत्नाने या मोठ्या समस्येला तोंड दिले जावू शकते आणि हाच बुद्धाचा मार्ग आहे, जगाला सुखी करायचे असेल तर स्वतःमधून बाहेर पडून जगाची संकुचित विचारसरणी त्यागली पाहिजे. संपूर्णतेचा हा बुद्धाने दिलेला मंत्रच एकमेव मार्ग आहे, असे पंतप्रधान म्हणाले.जगाताील वेगवेगळ्या भागात शांतता अभियान असो अथवा तुर्कीये मधील भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती असतो, भारत संपूर्ण ताकदीनिशी प्रत्येक संकटकाळात सर्वांसोबत उभा राहतो. ‘परियक्ति, पटिपत्ती तसेच पटिवेध हा बुद्धाचा मार्ग आहे. गेल्या 9 वर्षात भारत या तीन ही बिंदुंवर वेगाने मार्गक्रमण करीत असल्याचेही मोदी म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top