ब्रिजटाउन
बेरील चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेल्या भारतीय संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चार्टर्ड विमानाने मायदेशी आणणार आहे. भारतीय संघ आज संध्याकाळी बार्बाडोसहून निघालाआणि उद्या संध्याकाळी दिल्लीला पोहोचणार आहे. मात्र, बीसीसीआयकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. टी-२० विश्वचषक २०२४ मधील रोमहर्षक विजयानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मायदेशी परतणार होता. मात्र बेरील चक्रीवादळामुळे भारतीय संघ भारतासाठी रवाना होऊ शकला नाही. त्यानंतर काल भारतीय संघ भारतात येण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार होता, मात्र खराब हवामानामुळे संघाचे वेळापत्रक विस्कळीत झाले. याबाबत जाहीर केलेलया अहवालात म्हटले आहे की, अटलांटिक महासागरात आलेल्या बेरील चक्रीवादळामुळे ताशी २१० किमी वेगाने वारे वाहत आहेत. हे श्रेणी ४ वादळ बार्बाडोसच्या पूर्व-आग्नेय पूर्वेला अंदाजे ५७० किमी अंतरावर होते आणि त्यामुळे विमानतळावरील कामकाज थांबवण्यात आले.