बीसीसीआयचा वार्षिक करार जाहीर!
२६ खेळाडूंना कोटय़वधींचा पगार

नवी दिल्ली- बीसीसीआयने ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ साठी करार जाहीर केला आहे. करारामध्ये एकूण २६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने खेळाडूंना ए प्लस, ए, बीआणि सी या ४ श्रेणींमध्ये स्थान दिले आहे. ए प्लस ग्रेडमध्ये चार खेळाडू आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली,जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. यात जडेजाचा प्रवेश नवीन आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना बीसीसीआय वार्षिक रिटेनरशिप फी म्हणून ७ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

बीसीसीआयने वार्षिक करारात ५ खेळाडूंना ए-ग्रेडमध्ये ठेवले आहे. त्याच वेळी ६ खेळाडू बी श्रेणीमध्ये आणि ११ खेळाडू-सी श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत. हार्दिक पांड्या,रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांना ए ग्रेडमध्ये ठेवण्यात आले आहे. लोकेश राहुल,श्रेयस अय्यर,चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज,सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांना बी-ग्रेडमध्ये स्थान मिळाले आहे.तशिखर धवन,शार्दुल ठाकूर,उमेश यादव, इशान किशन,दीपक हुडा,युझवेंद्र चहल,कुलदीप यादव,वॉशिंग्टन सुंदर,संजू सॅमसन,अर्शदीप सिंग आणि केएस भरत यांचा सी-ग्रेडमध्ये समावेश आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ए श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक ५ कोटी रुपये देते. बी ग्रेडमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि सी श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक रिटेनरशिप फी म्हणून १ कोटी रुपये मिळतात.

बीसीसीआयचा असा आहे वार्षिक करार
ए+ श्रेणी (७ कोटी) – विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह
ए श्रेणी (५ कोटी) – हार्दिक पंड्या, आर अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, अक्षर पटेल
बी श्रेणी (३ कोटी) – चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव.
सी श्रेणी (१ कोटी) – उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, ईशान किशन, दीपक हुडा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत.

Scroll to Top