बीड- आंबेजोगाई बस आगाराच्या बसचे पठाण मांडवा घाटामध्ये ब्रेक फेल झाले. यावेळी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. ही बस दरीत कोसळण्यापासून वाचली. त्यानंतर बसमधून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
आंबेजोगाई आगाराच्या सर्वच बसेस भंगार व बिकट स्थिती असल्याची तक्रार नेहमीच करण्यात येते. यामुळे प्रवाशांच्या जिवीताशी खेळ चालला असून त्या विरोधात प्रवाशांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. आज आंबेजोगाई आगाराची एमएच १४ बीटी १७१९ या क्रमांकाची बस घाटातून जात असताना अचानक तिचे या बसचे ब्रेक फेल झाले. चालकाने यावेळी ही बस कठड्याला धडकवली व ती थांबवण्यात त्यांना यश आले. त्यानंतर बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. गेल्या वर्षीही मुकूंदराज घाटातही अशाच प्रकारे एक बस कोसळली होती. वरिष्ठांच्या हलगर्जीपणामुळे या घटना घडत असून अशा बस प्रवाशांसाठी पाठवू नयेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बीडच्या पठाण मांडवा घाटात एसटीची मोठी दुर्घटना टळली
