बांदा – सावंतवाडी येथे दुर्गम भागात असनिये व घारपी ही दोन गावे आहेत. येथील ग्रामस्थांना मोबाईल नेटवर्क मिळावे यासाठी भारत संचार निगमकडून दोन टॉवर उभारण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांत हे टॉवर कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत. टॉवर कार्यान्वित केले नसल्याने ग्रामस्थांना याचा फायदा होत नाही. याविरोधात भाजपा पदाधिकारी गुरु कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या सावंतवाडी कार्यालयावर आज धडक दिली. सप्टेंबर अखेरपर्यंत सदर दोन्ही टॉवर कार्यान्वित न केल्यास दोन्ही गावातील ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यावर कंत्राटदाराला संपर्क करत महिन्याभरात टॉवर कार्यान्वित करण्याचे आदेश विभागीय अभियंता प्रकाश गंगावती यांनी दिले.
बीएसएनएल टॉवर सुरु करा ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
