Home / News / बिहारमध्ये बसच्या अपघातात ८ परदेशी बौद्ध भिक्खू जखमी

बिहारमध्ये बसच्या अपघातात ८ परदेशी बौद्ध भिक्खू जखमी

जहानाबाद – बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील कडौना पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग ८३ वर झालेल्या एका अपघातात ८ परदेशी बौद्ध भिक्खू...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

जहानाबाद – बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील कडौना पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग ८३ वर झालेल्या एका अपघातात ८ परदेशी बौद्ध भिक्खू जखमी झाले आहेत.
आज सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हलरला ट्रकने धडक दिल्यानंतर हा टेम्पो ट्रॅव्हलर खड्ड्यात पडला. या अपघातात बसमधील ८ बौद्ध भिक्खू जखमी झाले आहेत. यामधील दोघांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना पाटण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी हे तैवानचे असून ते बोधगया इथे जात होते. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला. या अपघातात परदेशी नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत मदतकार्य केले.

Web Title:
संबंधित बातम्या