भागलपूर- बिहारमध्ये पुन्हा एकदा पूल कोसळण्याची घटना घडली. भागलपूरमधील सुलतानगंज-अगुवानी गंगा नदीवरील बांधकाम सुरु असलेला पूल आज कोसळला. विशेष म्हणजे, हा चौपदरी पूल तिसऱ्यांदा गंगा कोसळला.
गलपूरमधील सुलतानगंज-अगुवानी पूल हा उत्तर आणि दक्षिण बिहारला जोडणारा बिहार सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला १७१० कोटी रुपये खर्च येणार आहे. एसपी सिंगला कंपनीनार्फत हा पूल बांधण्याचे काम सुरु आहे. या पुलाची लांबी ३.१६० किलोमीटर आहे. यापूर्वीदेखील दोन वेळा हा पूल पडल्याची घटना घडली आहे. २७ एप्रिल २०२२ रोजी जोरदार वादळ आणि पावसामुळे या पुलाचा १०० फूट लांबीचा भाग नदीत पडला होता. त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्यानंतर पुन्हा एकदा ४ जून २०२३ रोजी या पुलाचा भाग नदीत पडला होता.