श्रीनगरजम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज दुपारी १२.२६ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी होती, तर त्याची खोली जमिनीच्या १० किलोमीटर होती. त्याआधी आज पहाटे २.०२ वाजता लेहमध्ये ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या दोन्ही भूकंपांत कोणताही जीवितहानी झालेली नाही. मात्र या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बारामुल्ला, लेहमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के
