वॉशिंग्टन –
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अमेरिकन संसदेचे सभापती केविन मॅकार्थी यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात महाभियोगाची चौकशी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मॅककार्थी यांनी बायडेन कुटुंबाच्या व्यावसायिक व्यवहारांची चौकशी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2024 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर ज्यो बायडेन यांच्याविरुद्धच्या या महाभियोगाला मान्यता देणे ही मोठी बाब मानली जात आहे.
मॅकार्थी यांनी दावा केला की, हाउस ओवरसाइट कमिटीने आतापर्यंत तपासात बायडेन यांच्या कुटुंबाच्या व्यवहारात भ्रष्टाचार आढळून आला आहे. राष्ट्रपती बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन याच्या व्यावसायिक व्यवहारांशी संबंधित हे प्रकऱण आहे. मॅकार्थी यांनी सांगितलं की, हा सत्तेचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचाराचा आरोप आहे. यामुळे महाभियोगाद्वारे चौकशी करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही आज संसदेच्या समितीला राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याविरुद्ध औपचारिक महाभियोग चौकशी सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
बायडेन यांच्या अडचणी वाढल्या संसदेत महाभियोगाला मान्यता
