वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आपल्या शेवटच्या आदेशाद्वारे आपल्या बहिण भावांना व काँग्रेसच्या काही सदस्यांना विविध खटल्यांमधून माफी दिली आहे. मला टार्गेट करण्यासाठी माझ्या कुटुंबियांवर आरोप करण्यात आले. मी गेल्यानंतर त्यांना न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने मी त्यांना माफ करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ज्यो बायडन यांनी आपला भाऊ जेम्स व त्याची पत्नी, बहीण वैलेरी ओवेन्स, तिचे पती जॉन ओवेन्स, फ्रांसिस बायडन यांना माफी दिली आहे. हा आदेश त्यांनी पद सोडण्याच्या अगदी काही मिनीटापूर्वी दिला. याआधी त्यांनी आपला मुलगा हंटर यालाही त्यांनी दोन गुन्ह्यांमधून माफी दिली होती. काही काँग्रेस सदस्यांनाही माफी दिली. या सदस्यांनी चार वर्षांपूर्वी कॅपिटल हिलवर झालेल्या हल्ल्यातील ट्रम्प यांच्या भूमिकेचा तपास केला होता.