बंगळुरु – स्टार्टअप कंपनी बायजूजने कर्मचाऱ्यांचे २.३ कोटी रुपयांचे वेतन थकविले असून कंपनीच्या ६२ कर्मचाऱ्यांनी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला आहे.बायजूजने जानेवारी २०२४ पासून या कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेले नाही. त्यामुळे या ६२ कर्मचाऱ्यांनी कॅनव्हास लिगल या कायदेविषयक सल्लागार कंपनीमार्फत बायजूजला नोटीस पाठविली आहे. गेल्या दोन वर्षांपासून बायजूज अनेक कारणांमुळे अडचणीत आली आहे. बायजूजच्या बाजार मुल्यामध्ये मोठी घसरण झाली आहे. कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या अनेक गुंतवणूकदारांनी कंपनीवर खटले दाखल केले आहेत. विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेली बायजूज आता कर्मचाऱ्यांच्या नोटीसीमुळे अधिकच अडचणीत आली आहे.