देहरादून :योगगुरू बाबा रामदेव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी ते आपल्या कोणत्याही वक्तव्यामुळे किंवा योगामुळे नाही तर भव्य लँड रोव्हर डिफेंडर १३० गाडी चालवल्यामुळे चर्चेत आहे. योगगुरू बाबा रामदेव हरिद्वार येथे लँड रोव्हर डिफेंडर १३० चालवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे गाडीला नंबर प्लेट नाही. ही गाडी रामदेव बाबा यांची आहे की नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही. मात्र दीड कोटींची गाडी सध्या रामदेव बाबा चालवताना पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले – हे बाबा नाहीत, ते भारतातील १७वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, तर एकाने लिहिले- देशी-देशी बोलून विदेशी कार बाबा!.
बाबा रामदेव यांनी चालवली लँड रोव्हर डिफेंडर गाडी!
