कोची – बाबा रामदेवांच्या पतंजली उत्पादनांविरोधात देशातील वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खटले दाखल सुरू आहेत.त्यातील एका प्रकरणी केरळच्या पलक्कड जिल्हा न्यायालयात बाबा रामदेव आणि पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांना गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले. केरळच्या औषध निरीक्षकाने पतंजलीच्या दिव्या फार्मसीविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला हे दोघेही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने दोघांविरुद्ध १५ फेब्रुवारीला हजर राहण्याचे अजामीनपात्र वॉरंट जारी केले. यादिवशी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. हे प्रकरण दिव्या फार्मसीने प्रकाशित केलेल्या कथित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित आहे.यावर केरळ औषध निरीक्षकाने कारवाई केली होती. पतंजली कापूर उत्पादनांच्या विक्रीवर बंदीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पतंजलीला ४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बाबा रामदेव यांच्यावर कोरोना बरा करण्याचा खोटा दावा केल्याचा आणि आधुनिक औषधांना निरुपयोगी म्हटल्याचा आरोप केला होता.
बाबा रामदेवांच्या अडचणीत वाढ केरळ कोर्टाचे अजामीन पात्र वॉरंट
