मुंबई – बांगलादेशी महिलने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. दक्षिण मुंबईतील कमाठीपुरा परिसरात मुंबई पोलिसांनी ५ बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर स्थलांतर केल्या प्रकरणी अटक केली. कमाठीपुरा परिसरातील स्थानिक दलालाने या ५ बांगलादेशी नागरिकांना बनावट ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे तयार करून दिली होती. त्याला ही पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी उर्मिला खातुन (२३) या महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे पोलीस चौकशीत समोर आले.
या महिलेला लाडकी बहिण योजनेचे २ हफ्ते मिळाले होते. मुंबई पोलिसांनी या बांगलादेशी महिलेचे आधारकार्ड बनावट असल्याचा दावा केला आहे. मात्र या महिलेचे वकील सुनील पांडे यांनी म्हटले की, या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला यावरून ती भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध होते.
बांगलादेशी महिलेने लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला
