मुंबई – बनावट पासपोर्ट बनवुन मालदीवला जाण्यासाठी मुंबईत आलेल्या सुरतमधील एका नागरिकाला त्याच्या बांगलादेशी पत्नीसोबत सहार पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद यासीन मोहम्मद सलमान शेख आणि ताहेरा खानूम आरिफ शेख असे या अटक केलेल्या जोडप्याचे नाव आहे.
ताहेरा ही बांगलादेशी असून ती गेल्यावर्षी भारतात आली. त्यानंतर ती उत्तर प्रदेशमध्ये राहत होती. तिथून ती गुजरातच्या सूरत शहरात आली. तिने सुरतच्या मोहम्मद यासीन याच्याशी लग्न केले. पण गेल्या आठवड्यात दोघेही सुरतमध्ये बनावट पासपोर्ट बनवुन मुंबईत आले होते. ते दोघेही मालदीवला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. मात्र, त्याठिकाणी इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या चौकशीत त्यांचे बिंग फुटले. चौकशीत ताहेरा ही बांगलादेशी असल्याचे उघड झाले. आता सहार पोलिसांनी बोगस दस्तावेज वापरून सूरतमधून पासपोर्ट बनवल्याप्रकरणी या जोडप्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बांगलादेशी पत्नीसोबत सुरतच्या नागरिकाला मुंबईत अटक
