ढाका – बांगलादेशातील नॅशलिस्ट पार्टीच्या प्रमुख आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बँक खात्यांवरील बंदी उठवण्यात आली आहे. १७ वर्षांपूर्वी त्यांची बँक खाती गोठवण्यात आली होती. बांगलादेश आवामी लिगच्या सरकारच्या काळात त्या १७ वर्षे तुरुंगात होत्या. त्यांची सुटका केल्यानंतर आता त्यांची गोठवलेली बँक खातीही खुली करण्यात आली.
खालिदा झिया या बांगलादेशातील महत्त्वाच्या राजकीय नेत्या असून याआधी दोनदा त्या पंतप्रधान राहिलेल्या आहेत. २००७ साली बांगलादेशच्या केंद्रीय गुप्तचर खात्याने त्यांची बँक खाती गोठवण्याची शिफारस केल्यानंतर तत्कालीन लष्करी पाठिंब्यावरील सरकारने त्यांची बँक खाती गोठवली होती. ही खाती खुली करण्याची विनंती त्यांनी अनेकवेळा सरकारकडे केली होती. त्यानंतर त्यांना स्वखर्चासाठी, दरमहा काही रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली होती. बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले. त्यानंतर आलेल्या काळजीवाहू सरकारने खालिदा झिया यांची तुरुंगातून सुटका केली . आता त्यांची बँक खातीही खुली केली आहेत.