फलटण-फलटणहून आज सकाळी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने संध्याकाळी बरड येथे मुक्काम केला. त्यावेळी बरडमध्ये लोकांनी या पालखीचे जंगी स्वागत करत पालखीचे दर्शन घेतले, तर इंदापूरमध्ये आज सकाळी निमगाव केतकी येथून निघालेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण पार पडले. त्यावेळी वारकर्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत या रिंगण सोहळ्याची शोभा वाढवली.काल संध्याकाळी तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकी पालखी तालावर मुक्कामाला होती. सकाळी ही पालखी गोकुळीचा ओढा मार्गे निघाल्यानंतर इंदापूरमध्ये दुपारी दाखल झाली. येथे या पालखीचे दुसरे गोल रिंगण विठ्ठलाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. त्यानंतर या पालखीने इंदापूर पालखी तळावर मुक्काम केला. उद्या सकाळी ही पालखी बावडा मार्गे सराटीकडे निघेल. त्यानंतर ही पालखी सराटी पालखी तळावर विसावले. १२ जुलै रोजी अकलूजच्या माने विद्यालयात या पालखीचे तिसरे गोल रिंगण होईल. त्यानंतर माने विद्यालयातच ही पालखी मुक्काम करेल. ज्ञानेबांच्या पालखी उद्या सकाळी बरडहून पंढरपुरच्या दिशेने निघेल. यादिवशी ही पालखीचा नातेपुते येथे मुक्काम असेल.
बरडमध्ये ज्ञानेबांची पालखी मुक्कमी इंदापुरात तुकोबांचे गोल रिंगण संपन्न
