सोलापूर- आगामी विधासनभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना माढा विधासनभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात पुतणे धनराज शिंदे यांचे बंड केला आहे. धनराज शिंदे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आमदार शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत.
मानेगाव येथे धनराज शिंदे यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात माढा विधासनभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची धनराज शिंदे यांनी घोषणा केली. ते पुढे म्हणाले की, “माढा मतदारसंघाच्या विकासासाठी मी निवडणूक लढणार आहे. त्यासाठी शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. आमदार बबन शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून फसवणूक केली. ” काही दिवसांआधीच पंढरपुरात धनराज शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनराज शिंदे माढा विधासनभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची राजकीय चर्चा होती.
बबन शिंदे यांच्या विरोधात पुतणे धनराज शिंदे यांचे बंड
