बद्रीनाथ – बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे येत्या ४ मे रोजी सकाळी ६ वाजता उघडण्यात येणार आहेत. काल चामोली येथील नरेंद्र नगरच्या ताहिरी राजदरबारात हा निर्णय घेण्यात आला. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे हे मंदिर बंद करण्यात येते ते नंतर उन्हाळ्यात उघडण्यात येते. उन्हाळ्यासाठी मंदिर उघडण्याची तारीख वसंत पंचमीच्या दिवशी ठरवण्यात येत असते.परंपरेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख काल घोषित करण्यात आली. यासाठी चामोली राजघराण्याच्या पारंपारिक राज दरबारात गणेश पंचाग व चौकी पूजा करण्यात आली. त्यानंतर राजपुरोहित आचार्य क्रिष्ण प्रसाद उनीयाल यांनी उन्हाळ्यातील मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख घोषित केली. यावेळी तेहरीचे महाराज मानवेंद्र सिंग, त्यांची पत्नी, मुलगी श्रीजानंद, तेहरी लोकसभा खासदार माला राज्य लक्ष्मी शहा, बद्रीनाथचे मुख्य पुजारी रावल अमरनाथ नंबुद्री, बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय तापलियाल व इतर अधिकारी उपस्थित होते.
बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे ४ मे रोजी उघडणार
