१६ मजुरांना वाचविण्यात यश डेहराडून – उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात चमोली -बद्रीनाथ महामार्गावर आज दुपारी एक मोठा हिमकडा कोसळून बर्फाच्या ढिगाऱ्याखाली ५७ मजूर गाडले गेले. त्यापैकी १६ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. तर अडकलेल्या बाकीच्या मजुरांची सुटका करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बजाव कार्य हाती घेण्यात आले. चमोलीच्या माना गावात ही घटना घडली. येथे चमोली-बद्रीनाथ महामार्गाचे काम सुरू आहे.मजूर रस्त्याचे काम करीत असताना दुपारी अचानक हिमस्खलन होऊन बर्फाचा भलामोठा कडा खाली कोसळला. घटनेचे वृत्त कळताच एनडीआरएफ, एसडीआरएफ, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांसह बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची (इंडो-तिबेट बीआरओ) पथके घटनास्थळी दाखल झाली. हा भाग भारत -चीन सीमेलगत आहे. इंडो-तिबेट बीआरओच्या वतीने हे महामार्गाचे काम सध्या काम सुरू आहे. गेले ४८ तास उत्तराखंडमध्ये बेफाम बर्फवृष्टी होत आहे.येथील सर्व शिखरे बर्फाने झाकली गेली आहेत.