चमोली : गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम, या चारधाम यात्रेला मोठ्या संखेने भाविक भेट देत असतात. बद्रीनाथ मंदिर हे श्री हरींच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. २७ एप्रिलला ब्रह्म मुहूर्तावर बद्रीनाथचे दरवाजे उघडले जातील. ज्याद्वारे सर्वसामान्य यात्रेकरू भगवान बद्रीनाथाचे दर्शन घेऊ शकतील. भक्त पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे यमुनोत्रीपासून गंगोत्री, केदारनाथपर्यंत चालत जातात आणि शेवटी त्यांची यात्रा पूर्ण करण्यासाठी बद्रीनाथला पोहोचतात.
ज्यांना उत्तराखंडच्या चारधामला जायचे आहे, त्यांना उत्तराखंड पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र मिळेल. उत्तराखंडमध्ये पोहोचल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्राच्या बारकोडच्या आधारे प्रवाशांना दर्शनासाठी टोकन मिळणार आहे. टोकन मिळाल्यानंतर प्रवाशांना दर्शन घेता येईल.दररोज १८ हजार यात्रेकरू बद्रीनाथ धामला भेट देऊ शकतील. केदारनाथमध्ये १५ हजार, गंगोत्रीमध्ये ९ हजार आणि यमुनोत्रीमध्ये ५ हजार ५०० यात्रेकरू रोज येऊ अशी शक्यता आहे.