बदलापूर- बदलापूर रेल्वे स्थानकात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. इंजिनमधील बिघाडामुळे मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकावरच थांबली होती. मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे याचा फटका मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला बसला. कर्जत आणि मुंबईच्या दिशेला येणारी लोकल वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे मुंबईच्या दिशेला कामाला येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे बदलापूरसह सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर अर्ध्या तासानंतर मालगाडी कर्जतच्या दिशेने रवाना झाली.
बदलापूरात मालगाडीत बिघाड! मध्य रेल्वे खोळंबली
