बडोदा
गुजरातच्या बडोदा शहरात पुरामुळे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे अनेक मगरींचादेखील बडोदा शहरात वावर वाढला. या मगरींची सुटका करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बचावपथकाचे दोन कर्मचारी एका मगरीला चक्क दुचाकीवरून घेऊन गेले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
२७ ऑगस्ट ते २९ ऑगस्टदरम्यान वडोदा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे विश्वामित्री नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर २४ मगरी पुराच्या पाण्यात वाहून बडोदा शहरात आल्या. या मगरी बडोदा शहरात विविध परिसरात आल्या. या मगरींना पकडून त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये घेऊन जात असतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. रेस्क्यू सेंटरचे कर्मचारी एका मगरीला पकडून दुचाकीवरून घेऊन जात आहेत. त्यांच्या गाड्या इतर रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठवण्यात आल्याने या दोन कर्मचार्यांना या मगरीला दुचाकीवरून घेऊन जाण्याची वेळ आली. एका व्यक्तीने याचा व्हिडिओ मोबाइलमध्ये टिपला. तो सोशल मिडियावर अपलोड केला. काही वेळातच हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.