बजरंग बलीची गदा त्यांच्या टाळक्यात! संजय राऊतांनी मोदी, शहांना डिवचले

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवून काँग्रेसने विजयचा झेंडा रोवला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण असून भाजपच्या गोटात शांतता पसरली आहे. या निकालावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. राऊत म्हणाले, ‘कर्नाटकात कोणतीच स्टोरी चालली नाही. फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. बजरंग बलीची गदा त्यांच्या टाळक्यात पडली. हा मोदी आणि शाह यांचा पराभव आहे. त्यांनी पराभव स्वीकारावा.’

संजय राऊत म्हणाले की, “कर्नाटकात काँग्रेस सत्ता स्थापन करेल. काँग्रेसचा विजय हा कर्नाटकातील भाजपचा पराभव नसून मोदी आणि शाह यांचा हा पराभव आहे. या दोन्ही नेत्यांनी कर्नाटकात तळ ठोकला होता. प्रत्येक निवडणुकीत ते तंबू ठोकतात. पण तरीही कर्नाटकातील जनतेने मोदी आणि शाह यांना झिडकारले आहे, राज्या राज्यातून भाजपच्या टोळ्या कर्नाटकात खोके घेऊन आल्या होत्या. पण कर्नाटकातील जनता भाजपच्या दबावाला बळी पडली नाही. आता पराभव झाला तरी तोडफोड करून काही करता येते का ते भाजप पाहत आहे.”

पुढे राऊत म्हणाले, ‘कर्नाटकात कोणतीच स्टोरी चालली नाही. फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. कर्नाटकात श्रीराम आणि बजरंगबली सत्याच्या बाजूने आले. हा मोदी आणि शाह यांचा पराभव झाला. मोदींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पराभव समोर आल्याने त्यांनी बजरंबलीला निवडणुकीत आणले. पण बजरंग बलीची गदा त्यांच्या टाळक्यात पडली.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top